IND vs SA: पहिला वनडे सामना कधी व कुठे खेळला जाणार? पाहा एका क्लिकवर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. यावेळी, दोन्ही संघ कसोटी सामन्यात नव्हे तर एकदिवसीय सामन्यात आमनेसामने भिडतील. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी जाणून घेऊया वनडे सामन्यांचे वेळापत्रक आणि सामने कधी सुरु होणार.
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्यास सज्ज आहे. मालिकेत एकूण तीन सामने खेळले जातील. पहिला सामना 30 नोव्हेंबर रोजी रांचीमध्ये खेळला जाईल. म्हणून संघातील खेळाडू पोहोचण्यास सुरुवात केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे या मालिकेचे मुख्य आकर्षण असतील, त्यांनी रांचीमध्ये येऊन तयारी सुरू केली आहे. कोहली आणि रोहित सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळे या मालिकेभोवती मोठा उत्साह आहे.
पहिला सामना रांची येथे आहे आणि त्यानंतर दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी रायपूरला रवाना होतील. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा यानंतर संपणार नाही. शेवटी, पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका देखील नियोजित आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.
सामन्याच्या वेळेबाबत, तिन्ही सामने दुपारी 1.30 वाजता खेळवले जातील. त्यापूर्वी अर्धा तास आधी, ठीक 1 वाजता, दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरतील. हा सामना 50 षटकांचा असल्याने, तो रात्री 10 वाजेपर्यंत संपण्याची अपेक्षा आहे. कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये कशी कामगिरी करते हे पाहणे बाकी आहे.
Comments are closed.