IND vs SA: लाईव्ह सामन्यात राडा… डेव्हिड मिलर- वाँशिंग्टन सुंदर यांच्यात शाब्दिक चकमक; VIDEO VIRAL

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ फेरीत टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. नाणेफेक जिंकत पहिल्या डावात खेळताना दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १८८ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर प्रभावी गोलंदाजी करत भारत १८.५ षटकांत फक्त १११ धावांवर बाद झाला. ७६ धावांचा हा पराभव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील धावांनी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला.
या सामन्यात मैदानावर शाब्दिक वादही झाला. पहिल्या डावात भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर यांच्यात वाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाच्या १४ व्या षटकानंतर ड्रींक्स ब्रेक दरम्यान, सुंदर आणि मिलर यांच्यात काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली.
नेमके कारण स्पष्ट नसले तरी, मिलरने सुंदरशी काहीसे नाराज स्वरात बोलले आणि सुंदरनेही त्याला लगेच उत्तर दिले. वातावरण तापण्याआधीच मैदानावरील पंच आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, उपकर्णधार अक्षर पटेलच्या जागी सुंदरला अंतिम अकरा संघात संधी देण्यात आली. तथापि, तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. सुंदरने २ षटकांत १७ धावा दिल्या, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. भारताच्या पराभवातून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांचे अपयश स्पष्टपणे दिसून आले.
या पराभवामुळे भारतीय संघ आडचणीत सापडला आहेय पुढील दोन्ही सामने संघासाठी करा किंवा मरा अश्या स्थितीत आहेत. शिवाय भारतीय संघाला मोठा मिळवावा लागणार आहे. 76 धावांच्या फरकाने पराभव झाल्याने टीम इंडियाच्या नेट रनरेटवर मोठा फरक पडला आहे.
Comments are closed.