कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा क्षण; IND vs SA सामन्यात नोंदला अनोखा कीर्तिमान
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर 6 गडी गमावून 247 धावा केल्या आहेत.
आफ्रिकेच्या संघासाठी रियान रिकेल्टन आणि एडन मार्करामने डावाची सुरुवात केली. त्यांनी 82 धावांची भागीदारी करत स्थिर सुरुवात केली. मार्कराम 38 धावांवर बाद झाला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्ससोबत धावा करण्याची जबाबदारी रिकल्टनने घेतली. दोघांनीही मैदानावर अनेक फटकेबाजी केली. रिकल्टन 35 धावांवर बाद झाला. नंतर स्टब्सने 112 चेंडूत 49 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने 92 चेंडूत एकूण 41 धावा केल्या, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता. नंतर, सेनुरन मुथुसामीने 25 धावांचे योगदान दिले. टोनी डी जॉर्गीने 28 धावा केल्या. मुथुसामी आणि काइल व्हेरेन सध्या क्रीजवर आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या पहिल्या चार फलंदाजांनी 35 किंवा त्याहून अधिक धावा केल्या, परंतु त्यापैकी कोणीही अर्धशतक गाठू शकले नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे की एखाद्या संघाच्या पहिल्या चार फलंदाजांनी एका डावात 35 किंवा त्याहून अधिक धावा केल्या, परंतु त्यापैकी कोणीही 50 पर्यंत पोहोचले नाही. यापूर्वी कधीही असे पाहिले नव्हते.
भारतीय क्रिकेट संघासाठी, कुलदीप यादवने सर्वाधिक तीन बळी घेतले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. आता, दुसऱ्या दिवशी, भारतीय गोलंदाज आफ्रिकन संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित चार बळी लवकरात लवकर बाद कण्.
Comments are closed.