IND vs SA: भारताने सलग 20वा टॉस गमावला; आफ्रिकन संघात 3 बदल; पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामधील दुसरा वनडे सामना आज (3 डिसेंबर) रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस जिंकत दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. विशेष म्हणजे, भारताने वनडे क्रिकेटमध्ये सलग 20वा टॉस गमावला आहे.

दक्षिण आफ्रिकेने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. कर्णधार टेम्बा बावुमा, स्पिनर केशव महाराज आणि वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी यांची टीममध्ये पुनरागमन झाले आहे. रांचीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत बावुमा आणि महाराज यांना विश्रांती देण्यात आली होती. भारताने मात्र कोणताही बदल न करता पहिल्या सामन्यातीलच संघ कायम ठेवला आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला आज विजय मिळवून अजेय आघाडी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. पहिल्या वनडेत भारताने 17 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात विराट कोहलीने करिअरमधील ऐतिहासिक 52वे शतक झळकावले. आजही कोहलीकडून फलंदाजीची मोठी अपेक्षा आहे. तसेच रांची वनडेत अर्धशतक ठोकणाऱ्या रोहित शर्माकडेही सर्वांची नजर असणार आहे.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पूर्ण शक्तीने मैदानात उतरणार आहे. मालिकेचं पारडं कोणत्या बाजूला झुकतं हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

दोन्ही संघाच्या प्लेइंग -11

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (क), मॅथ्यू ब्रेत्झके, टोनी डी जोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॉन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्जर, लुंगी एनगिडी.

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंगटन सुंदर, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

Comments are closed.