IND vs SA: फक्त शुभमन गिलच नाही, या खेळाडूच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह; अंतिम निर्णय कधी होणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात नियमित भारतीय कर्णधार शुभमन गिलचा सहभाग अशक्य दिसत आहे. मानेच्या दुखापतीमुळे तो रिटायर्ड हर्ट झाला आणि दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचा सहभागही अनिश्चित आहे. तो गुरुवारी सरावात सहभागी झाला नाही.

भारताविरुद्धच्या कोलकाता कसोटीपूर्वी सराव करताना रबाडाच्या बरगड्यांना दुखापत झाली होती, त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज खेळण्याच्या शक्यतेबाबत बोथा म्हणाले, “आम्ही कागिसो रबाडाचे निरीक्षण करत आहोत आणि पुढील 24 तासांत निर्णय घेऊ.”

गुवाहाटी पहिल्यांदाच कसोटी सामना आयोजित करत आहे आणि दोन्ही संघांना बारसापारा स्टेडियममधील खेळपट्टीची माहिती नाही. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजी प्रशिक्षक पीट बोथा यांनी खेळपट्टीबद्दल सांगितले की, “आम्हाला सांगण्यात आले आहे की (गुवाहाटीमधील) खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. पण गवत आहे की नाही हे मोठा फरक पडतो. दोन दिवस शिल्लक असताना, आम्हाला वाट पहावी लागेल आणि ते लवकर टर्न होते का? ते पहावे लागेल.”

सायमन हार्मरने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसाठी शानदार गोलंदाजी केली ज्यात त्याने 8 बळी घेतले. त्याच्या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजी प्रशिक्षक पीट बोथा म्हणाले की, हार्मरला खांद्याची कोणतीही समस्या नाही. जर कोलकाताप्रमाणे चेंडू लवकर वळू लागला, तर फलंदाजीच्या क्रमाने इतके डावखुरे फलंदाज असल्याने तो धोकादायक ठरेल. आम्ही हे आज सकाळी पाहिले. अजून दोन दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे ते खरोखरच खेळपट्टीवरून अधिक गवत कापतील की नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे निश्चितच फरक पडेल.

Comments are closed.