IND vs SA: मालिका सुरू होण्याआधीच बवुमाचा दणका, “भारताला यावेळी घरातच हरवू!”
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, ज्यात ते पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेच्या समाप्तीनंतर, टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीतील विजेत्या दक्षिण आफ्रिकेशी 14 नोव्हेंबरपासून घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही टीमचे संघ जाहीर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा पुनरागमन करत आहे, जो पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतीमुळे संघाचा भाग नव्हता. भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत बावुमा मैदानात परतणार आहे आणि त्याने मालिकेपूर्वी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका कर्णधार टेम्बा बावुमाने पीटीआयला दिलेल्या निवेदनात मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की भारतात मालिका जिंकणे सोपे नसले तरी या वेळेस त्यांच्या संघाकडे खऱ्या अर्थाने ती पार करण्याची क्षमता आहे.
बावुमा म्हणाला, “भारतात आम्ही खूप काळापासून कसोटी मालिका जिंकलेली नाही. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कोहली आणि रोहितसारखे अनुभवी खेळाडू आता संघात नाहीत. नवीन खेळाडू त्यांच्या जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती नक्कीच सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आम्ही या मालिकेकडे एक मोठी संधी म्हणून पाहत आहोत.”
त्याने पुढे गोलंदाजी विभागाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करत म्हणाला, “गोलंदाजी हा आमचा नेहमीच मजबूत विभाग राहिला आहे. यावेळीही आम्ही चांगल्या तयारीत आहोत. आमच्याकडे केशव महाराज, सेनुरन मुथुसामी आणि सायमन हार्मर अशी दमदार फिरकी तिकडी आहे. शिवाय, ट्रिस्टन स्टब्सलाही पार्ट-टाईम स्पिनचा पर्याय म्हणून वापरता येईल.”
भारत आणि दक्षिण आफ्रिका अ संघादरम्यान दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळली जात आहे, ज्याचा दुसरा सामना 6 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अनेक प्रमुख खेळाडू खेळण्याची अपेक्षा आहे. भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा देखील दुसऱ्या सामन्यात खेळेल, सर्वांचे लक्ष त्याच्या तंदुरुस्तीवर असेल.
Comments are closed.