IND Vs SA – सुपर 8 चा थरार सुरू! दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करणार
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुपर 8 मधील पहिला सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून टीम इंडियाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. उपकर्णधार अक्षर पटेलला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
उपकर्णधार अक्षर पटेलसह पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार गोलंदाजी करणारा कुलदीप यादवलाही या सामन्यासाठी तंबूत बसवण्यात आलं आहे. कुलदीप यादवच्या जागी अर्शदीप सिंगची संघात वर्णी लागली असून वॉशिंगटन सुंदरलाही पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तसेच अभिषेक शर्माच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या नावाची बरीच चर्चा झाली. परंतू त्याला संघात कायम ठेवण्यात आलं आहे.
टीम इंडियाची प्लेयिंग 11
अभिषेक शर्मा, ईशान किशन, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
Comments are closed.