पाकिस्तानी खेळाडूने टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाला, ‘आता रोहित-विराट संघात नाहीत, त्य
भारत वि एसए: ट्वेन्टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) प्रथम फलंदाजी करताना 188 धावांचे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले होते. मात्र, कागदावर बलवान असलेली भारतीय फलंदाजी (Indian Batting) पत्त्यासारखी कोसळली आणि अवघ्या 111 धावांमध्ये भारताचे सगळे गडी बाद झाले. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याने भारतीय संघाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्याने भारतीय संघ नेमका कुठे कमी पडला, यावर बोट ठेवले. (T 20 World Cup 2026)
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि उघडा पडला. आता भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली नाहीत, हा पूर्वीचा संघ राहिलेला नाही, ही गोष्ट अनेकजण विसरत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे परिस्थिती ओळखून त्याप्रमाणे खेळायचे, आपल्या खेळात बदल करायचे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने तीन डावखुरे फलंदाज मैदानात पाठवले. आफ्रिकेने त्यांच्याविरुद्ध ऑफ स्पिनर लावले. याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला, असे मोहम्मद आमीर याने म्हटले.
मोहम्मद आमीर याने यापूर्वीही अभिषेक शर्माचा फॉर्म आणि भारतीय संघाच्या कामगिरीबाबत टिप्पणी केली होती. त्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाची फलंदाजी तितकीशी ताकदवान नसल्याकडे लक्षही वेधले होते. पाकिस्तानविरुद्धचा सामना सोडून भारताच्या सगळ्या मॅच बघा. भारतीय फलंदाजी पत्त्यासारखी कोसळत आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सध्याच्या घडीला ज्याप्रकारे खेळत आहेत, ते कुठल्याही टीमला हरवू शकतात. त्यांच्याकडे परिपूर्ण अशी वेगवान आणि फिरकी गोलंदाजी आहे. त्यांचे सगळे फलंदाजी फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना होईल, असे भाकित मोहम्मद आमीर याने वर्तवले होते. हे भाकीत आता खरे ठरण्याची दाट शक्यता दिसत आहे.
Ind Vs Pak Abhishek Sharma: अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर…’
मोहम्मद आमीर याने भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा याच्याबाबत केलेले वक्तव्यही प्रचंड गाजले होते. अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर आहे. त्याला एका साध्या प्लाननेही बाद करता येईल. अभिषेकमध्ये सातत्य नाही आणि तो तांत्रिकदृष्ट्या चांगला फलंदाज नाही. अभिषेक आठ पैकी एका सामन्यात कामगिरी करतो, तर इतर सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारू शकला नाही, असे मोहम्मद आमीर याने म्हटले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.