आफ्रिकेसमोर टीम इंडियाचं कडवं आव्हान; टी20 हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

टी20 वर्ल्ड कप 2026 मधील सुपर-8 फेरीला काल शनिवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिलाच सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. जो पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कोलंबो येथे खेळवला जाणार होता. दरम्यान आज सुपर संडे असल्याने दोन सामने खेळवले जात आहेत. पहिला सामना दुपारी 2 वाजता इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आणि संध्याकाळी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7 वा. खेळवला जाईल.
मागील 2024 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आफ्रिकेवर मात करत टी20 वर्ल्ड कपची ट्राॅफी जिंकली होती. तेव्हापासून टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य आहे. आतापर्यंत भारताने सलग 12 सामने जिंकले आहेत. यंदाच्या स्पर्धेतील लीग सामन्यात दोन्ही संघ अपराजित आहे. या सामन्यात मात्र ही मालिका खंडीत होणार हे निश्चित. दरम्यान दोन्ही संघाच्या टी20मधील हेड टू हेड रेकाॅर्डवर एक नजर टाकूया.
टी20 क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 35 सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने 21 तर दक्षिण आफ्रिकेने 13 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ सात वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यात भारताने पाच वेळा विजय मिळवला आहे. 2007 च्या पहिल्या विश्वचषकात भारताने एक महत्त्वाचा सामना जिंकून उपांत्य फेरी गाठली होती, तर 2014 च्या उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या शानदार खेळीने भारताला अंतिम फेरीत पोहोचवले होते.
यंदाच्या स्पर्धेत दोन्ही संघ चांगल्या फाॅर्ममध्ये आहेत. दोन्ही संघाने त्यांचे लीग सामने जिंकून सुपर-8 फेरीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे मात्र नक्की.
Comments are closed.