IND Vs SL – निसांका-परेराची झुंजार खेळी व्यर्थ, हृदयाचा ठोका चुकवणारा सामना; अखेर टीम इंडियाने मारला विजयी षटकार

Asia Cup 2025 मधील टीम इंडियाने सुपर 4 मधील आपल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत स्पर्धेत विजयी षटकार मारला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने श्रीलंकेला 203 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेला निसांकाने 58 चेंडूंमध्ये 107 धावांची शतकीय खेळी केली. त्याला परेराची साथ मिळाली त्याने 32 चेंडूंमध्ये 52 धावा चोपून काढल्या. त्यामुळे 20 षटकांमध्ये श्रीलंकेनेही 5 गड्यांच्या मोबदल्यात 202 धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करतना श्रीलंकेने फक्त 2 धावा केल्या आणि टीम इंडियाने पहिल्याच चेंडूंत 3 धावा करत सामना जिंकला.
Comments are closed.