रोहितची विस्फोटक खेळी, युवराजची आक्रमकता… शेवटच्या भारत-यूएई सामन्यात काय घडलं?
भारत आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबर 2025 रोजी आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. दुबईमध्ये रात्री 8 वाजता संघाचा सामना यजमान यूएईशी होईल. कर्णधार सूर्यकुमार यादवने आधीच सांगितले आहे की टीम इंडिया यजमान संघाला हलके घेणार नाही. आशिया कपच्या इतिहासात दोन्ही संघ टी-20 मध्ये एकदा आमनेसामने आले आहेत. ती लढत 3 मार्च 2016 रोजी ढाका येथे झाली होती. त्या सामन्यात काय घडले आणि दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये काय निकाल दिले ते जाणून घेऊयात.
आशिया कपच्या इतिहासात दोन्ही संघांमधील टी-20 मध्ये झालेल्या याआधीच्या एकमेव लढतीबद्दल बोलयाचे झाले तर, त्या सामन्यात भारताने फक्त 61 चेंडूत लक्ष्य गाठले. रोहित शर्माने फलंदाजीने धुमाकूळ घातला. उर्वरित काम युवराज सिंगच्या स्फोटक फलंदाजीने पूर्ण झाले.
यूएईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. शैमन अन्वर (43) आणि रोहन मुस्तफा वगळता संघाचा कोणताही खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 2, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, हरभजन सिंग, पवन नेगी आणि युवराज सिंग यांनी 1-1 विकेट घेतल्या.
82 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला. याचा अंदाज यावरून येतो की जेव्हा त्याची विकेट 43 धावांवर पडली आणि भारताला पहिला धक्का बसला तेव्हा त्यात हिटमॅनचे योगदान 39 धावांचे होते. तोपर्यंत सहकारी सलामीवीर शिखर धवनने फक्त 2 धावा काढल्या होत्या आणि 2 अतिरिक्त धावा होत्या.
रोहित शर्माने 28 चेंडूत 39 धावा केल्या, ज्यात त्याने 7 चौकार आणि एक षटकार मारला. त्याची विकेट पडल्यानंतर युवराज सिंग फलंदाजीला आला. त्याने आणि शिखर धवनने मिळून 11व्या षटकातच भारताला विजय मिळवून दिला. धवनने 20 चेंडूत नाबाद 16 धावा आणि युवराज सिंगने 14 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. रोहित शर्माला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
जर आपण दोन्ही संघांच्या शेवटच्या 5 टी-20 सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांना एकही सामना जिंकला आलेला नाही. युएईला गेल्या सर्व पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, भारताच्या गेल्या 5 सामन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर त्यांनी 4 जिंकले आहेत आणि एक गमावला आहे.
Comments are closed.