अखेर कॅप्टन गिलने टाॅस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11

IND vs WI: भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आज, शुक्रवार 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

भारत- यशस्वी जयस्वाल, च्या एल. एक नर नाव, साई सुदर्शन, शुभमन गिल (करंधर), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीष कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रिट बुमराह, मोहम्मद सिराज

वेस्ट इंडिजः जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, एलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेज (कर्णधार), टेविन इमलाच (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्स, जोमेल वॉरिकन, खैरी पियरे, अँडरसन फिलिप, जेडन सील्स

पहिल्या कसोटीत भारताने डाव आणि 140 धावांनी विजय मिळवला होता आणि मालिका 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दिल्लीतील दुसरा सामना जिंकून भारत मालिका क्ली-स्वीप करण्याच्या इराद्याने उतरत आहे, तर वेस्टइंडीज समानता साधण्यासाठी शेवटचा प्रयत्न करेल.

Comments are closed.