IND vs WI: विजयानंतरही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होऊ शकतात 3 खेळाडू! गंभीर-गिल घेणार मोठा निर्णय

भारत आणि वेस्ट इंडिज (Odi series between India vs West Indies) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 मोठे बदल करू शकतात. त्यामुळे काही स्टार खेळाडूंना बाहेर बसावे लागू शकते.
पहिल्या वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज गुरनूर बरारची (Gurnoor barar) कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे त्याला दुसऱ्या वनडेतून बाहेर केले जाऊ शकते. त्याच्या जागी स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohmmed Siraj) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. तसेच, स्पिन ऑलराउंडर रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) कामगिरीही अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे त्यालाही प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी वेगवान गोलंदाजी करणारा ऑलराउंडर आकिब नबीला (Aquib Nabi) पदार्पणाची संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजीसोबतच आकिब नबी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना मोठे फटकेही खेळू शकतो.
पहिल्या वनडे सामन्यात बेंचवर असलेल्या यशस्वी जयस्वालला (Yashsvi Jaiswal) दुसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. जयस्वालने अलीकडच्या काळात शानदार कामगिरी केली आहे. गेल्या तीन वनडे सामन्यांत त्याने दमदार फलंदाजी करत दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे तो दिग्गज फलंदाज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये येऊ शकतो.
दिग्गज रोहित शर्माने पहिल्या सामन्यात फलंदाजीत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण, तो संघाच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे, सामन्यानंतर रोहित बसमधूनही पडला होता. त्यामुळे 39 वर्षीय रोहित शर्माच्या फिटनेसबाबत कोणतीही जोखीम घेतली जाणार नाही. परिणामी, दुसऱ्या सामन्यात हिटमॅनला
प्लेइंग इलेव्हनमधून मधून बाहेर बसावे लागू शकते.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, आकिब नबी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
Comments are closed.