IND vs WI: दिल्लीच्या मैदानावर ठरणार खरी परीक्षा! बुमराहची धार की गिलचा ग्लॅमर, कोण मारेल बाजी?
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याता खेळपट्टी पहिल्या कसोटीपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या पिचवर गवतामधून कोरडे पॅच दिसतील, तर अहमदाबादच्या मैदानावर समान गवताची पातळी होती.
दिल्लीचा पिच काळ्या मातीवर आधारित असून, सामन्याच्या सुरुवातीला फलंदाजांना मदत करू शकतो. मात्र, जसजसा सामना पुढे जाईल आणि पृष्ठभाग अधिक कोरडा होईल, तसतसे फिरकी गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरेल.
पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता, पण भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर त्यांची एकही चालली नाही. लाल मातीच्या पिचवर 4 मिमी गवत असल्याने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी अप्रतिम स्विंग आणि बाऊन्स मिळवला. परिणामी, वेस्ट इंडीजची पहिली डाव 44.1 षटकांत तर दुसरी डाव 45.1 षटकांत संपुष्टात आली आणि भारताने एक डाव व 140 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
ESPNCricinfoच्या अहवालानुसार, अरुण जेटली स्टेडियमवरील पिच फलंदाजांसाठी अनुकूल असेल. येथे जलद आऊटफिल्ड आणि लहान सीमारेषा असल्याने फलंदाजांना मोकळेपणाने खेळता येईल. मात्र, चौथ्या-पाचव्या दिवशी फिरकीपटूंना टर्न मिळण्याची शक्यता आहे.
या मैदानावर शेवटचा कसोटी सामना 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला होता. त्या वेळीही पिच मंद आणि टर्निंग होता, आणि भारताने तीन दिवसांतच 6 विकेट्सनी विजय मिळवला होता.
भारतीय संघ- शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन. जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव
Comments are closed.