टी-20 विश्वचषकात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज करो वा मरोची लढत; दोन्ही संघांची हादरवणारी Playin
Ind vs WI प्लेइंग इलेव्हन T20 विश्वचषक 2026: आयसीसी टी-20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) सामना रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना खेळवण्यात येणार असून दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज जो संघ जिंकेल, तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण चार टी-20 विश्वचषक सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजने यापैकी तीन जिंकले आहेत, तर भारताने फक्त एकदाच विजय मिळवला आहे.
भाषणाचा भाग 5 आता येथे आहे!
हार्दिक पांड्याकडून एक खळबळजनक शब्द! 🔥 🔥#TeamIndia 🇮🇳 | #T20WorldCup | #मेनइनब्लू | #INDvWINTER | @hardikpandya7 https://t.co/ozdhx6gYRq
— BCCI (@BCCI) 28 फेब्रुवारी 2026
वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडिया संघात कोणताही बदल न करण्याची शक्यता आहे. रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही. तर अभिषेक शर्मासह संजू सॅमसन सलामीसाठी मैदानात उतरेल. त्यानंतर इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या शिवम दुबे, अक्षर पटेल फलंदाजीची बाजू सांभाळतील. तर जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती गोलंदाजीची बाजू सांभाळतील. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिजकडे सामना कधीही कोणत्याही बाजूला वळवण्याची ताकद असणारे खेळाडू आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- (Ind vs WI Playing XI T20 World Cup 2026)
संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ब्रँडन किंग, शाई होप (यष्टिरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोस्टन चेस/अकील हुसेन, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती आणि शमार जोसेफ.
भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ- (West Indies Full Squad T20 WC)
बॅंडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकिल हुसेन, गुडाकेश मोटी, शमर जोसेफ, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोस्टन चेस आणि जॉन्सन चार्ल्स.
वेस्ट इंडिजचे हे खेळाडू धोकादायक- (WI Dangerous Player)
भारताला वेस्ट इंडिजचा फिरकीपटू गुडाकेश मोटी (6 सामन्यात 10 विकेट्स) आणि जेसन होल्डर (6 सामन्यात 8 विकेट्स) यांच्यापासून सावध राहावे लागेल. शिमरॉन हेटमायरने 6 सामन्यात 221 धावा केल्या आहेत. कर्णधार शाई होपने 6 सामन्यांमध्ये 185 धावा केल्या आहेत, तर शेरफेन रदरफोर्डने 6 सामन्यांमध्ये 169 धावा केल्या आहेत.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हेड-टू-हेड (एकूण टी-20)- (Ind vs WI Head To Head)
2009 ते 2023 पर्यंत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा विजयाचा रेट 65.71% आहे, ज्यामध्ये 19 विजय आणि 10 पराभव आहेत, तर वेस्ट इंडिजचा 10 विजय आणि 19 पराभवांसह 34.48% विजयाचा टक्का आहे. दोन्ही संघांचा एक अनिर्णीत सामना होता.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हेड-टू-हेड (टी-20 विश्वचषक)- (Ind vs WI)
2009 ते 2016 पर्यंत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या चार टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने फक्त एक सामना जिंकला आणि तीन गमावले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.