जैसवालचा जयजयकार; आणखी एका द्विशतकासमीप यशस्वी, पहिल्या दिवशी 2 बाद 318 अशी मजल
दिल्लीच्या अरुण जेट ली स्टेडियमवर आज हिंदुस्थानच्या यशस्वी जयसावल आणि साई सुदर्शन या दोघा 23 वर्ष कसोटीपटूंनी दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला? पाहुण्या पश्चिम इंडीजच्या गोलंदाजीला धार नसली तरी हिंदुस्थानी फलंदाजांनी त्यांना सन्मान देत धीर दिला? तरीही हिंदुस्थानने 90 षटकांच्या खेळात 2 नंतर 318 मजल मारत धावांच्या एव्हरेस्टच्या दिशेने झेप घेतली? पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जयसावल 173 तर कर्णधार शुभमन गिल 20 धावांवर खेळत असे?
आज दिवसाची सुरुवात भन्नाट झाली. शुभमन गिलने शेवटी टॉस जिंकला. तेसुद्धा सहा प्रयत्नांनंतर! आणि मग जणू टॉससोबत नशीबही त्याच्या खिशात आलं. हिंदुस्थान हा सामनाही तीन-चार दिवसांत जिंकणार, हे संघाची ताकद पाहता पुणी सांगेल. या सामन्यात हिंदुस्थानचा संघ 600 पेक्षा अधिक धावा रचत पाहुण्यांचे दोन्ही डाव पुढील दीड-दोन दिवसांत गुंडाळून सलग दुसऱ्या कसोटीतही डावाचा विजय नोंदवणार.
आजचा दिवस यशस्वी जैसवालने पुन्हा संस्मरणीय केला. ज्याच्या नावातच यश आहे आणि बॅटमध्ये सौंदर्य! त्याने 173 धावांची अभेद्य खेळी सजवली. जणू चांदणं सांडल्यासारखी. खेळीसुद्धा कोरीव कामासारखी होती. त्याने विंडीजच्या दुबळय़ा आक्रमणावर हिंसक हल्ला केला नाही. त्याच्या फलंदाजीत आज नजाकत होती. त्याने 253 चेंडूंच्या खेळीत एकदाही पाहुण्यांच्या गोलंदाजांना मैदानाबाहेर फेकले नाही. त्याने चौकारांचाच मनसोक्त आनंद घेतला. विशेष म्हणजे राहुलसह 58 धावांची सलामी दिल्यानंतर आपल्या समवयीन म्हणजेच 23 वर्षांच्या साई सुदर्शनच्या साथीने हिंदुस्थानच्या डावाला अडीचशेच्या पलीकडे नेले. तब्बल दोन सत्र आणि 51 षटके फलंदाजी करताना 193 धावांची भागी रचली. जैसवाल हा ‘बॅझबॉल’च्या शैलीतही फलंदाजी करू शकतो, पण त्याने आज मैदानात कसोटी क्रिकेट दाखवले. कधी संयमी, कधी शांत तर अधूनमधून चौकारांची बरसात करत त्यांनी एकेक टप्पे गाठत कसोटीचा अस्सल खेळ रंगवला.
आज यशस्वीच्या साथीला सुदर्शननेही भन्नाट खेळ केला. हे हिंदुस्थानी क्रिकेटचं नवं फूल असलं तरी सुगंधित असल्याचे त्याने सिद्ध केले. चौथीच कसोटी खेळत असलेल्या सुदर्शनला आज आपल्या शतकाचा आनंद लुटण्याची संधी होती, पण ती त्याने गमावली. मात्र टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने ठेवलेल्या विश्वासाला त्याने कमावलं. गेल्या सात डावांत एकदाच अर्धशतकी टप्पा गाठणाऱ्या सुदर्शनला शतकी खेळीचे स्वप्न साकार करता आले नाही. 13 धावांनी शतक हुकल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर सहज दिसले. पण त्याने मोठी भागी रचून संघाला धावांच्या एव्हरेस्टच्या दिशेने नेले.
अननुभवी फलंदाज आणि गोलंदाजांसह हिंदुस्थानात आलेला विंडीजचा संघ व्हेंटिलेटरवरच दिसत होता. आज त्यांनी शिस्त दाखवली. एकही एक्स्ट्रा दिला नाही! पण त्यांच्या गोलंदाजीला धार नव्हती. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजांनी हिंदुस्थानी फलंदाजांना फारसे चकवलेही नाही. यशस्वी आणि साईने अत्यंत सहजपणे विंडीजच्या गोलंदाजांचे आदरातिथ्य करत धावा काढल्या. त्यामुळे दिल्लीतर कसोटी क्रिकेट दिसलं.
आजच्या दिवसाचा मानकरी ठरलेल्या जैसवालने आपल्या 26 कसोटींच्या छोटय़ाशा कारकीर्दीत सातव्यांदा शतकी टप्पा गाठला. दिवसअखेर पाचव्यांदा दीडशेपार केले. उद्या तो आपले तिसरे द्विशतकही साजरे करील. संघाला 600 धावाही गाठून देईल. सुदर्शननंतर गिलसह यशस्वीने संयमाने खेळ करत पाहुण्यांना आणखी यश मिळू दिले नाही. उद्या धावांचा एव्हरेस्ट उभारण्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट होती.
जयस्वाल्ने ओलांडला 3,000 धावांचा टप्पा
जैसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची जादू दाखवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 3,000 धावांचा टप्पा पार करत नवा विक्रम नोंदवला. त्याने आतापर्यंत फक्त 50 सामन्यांत 47.81 च्या सरासरीने 3156 धावा केल्या आहेत, ज्यात 8 शतके आणि 17 अर्धशतके समाविष्ट आहेत. तसेच त्याने आपल्या कारकीर्दीतील सातवे कसोटी शतक झळकावत दिवसअखेर 173 नाबाद धावा केल्या. हिंदुस्थानात कसोटीच्या पहिल्याच दिवशी 150 अधिक धावा करणारा तो दुसऱ्यांदा फलंदाज ठरला आहे. याआधी 2024 मध्ये विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्ध त्याने 179 धावा झळकावल्या होत्या. यापूर्वी ही दुर्मिळ कामगिरी विराट कोहली यानेच दोन वेळा केली होती, 2016 मध्ये विशाखापट्टणम (151) आणि 2017 मध्ये दिल्ली (156). त्याच्या सात कसोटी शतकांपैकी पाच वेळा त्याने 150 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
Comments are closed.