भारत विरुद्ध वेस्टइंडीज, सेमीफायनलचं तिकीट की स्वप्नांचा अंत?, ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी कॅरिब
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 विश्वचषक 2026 : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीत 1 मार्च रोजी थरारक सामना रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो किंवा मरो’ असा आहे. जो संघ जिंकेल तो अंतिम चारमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाचे या मेगा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. दरम्यान, वेस्टइंडीजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) याने भारताविरुद्धच्या या निर्णायक लढतीपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे.
रोमारियो शेफर्ड काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाबाबत बोलताना शेफर्ड म्हणाला, “खरं सांगायचं तर आमच्याकडे पश्चात्ताप करण्यासाठी वेळ नाही. आम्हाला शांत राहून त्या मोठ्या सामन्यासाठी लवकरात लवकर सावरायचं आहे. हा सामना करो किंवा मरोचा आहे आणि आमचं भविष्य आमच्या हातात आहे. आम्ही मैदानात उतरून विजय मिळवू आणि सेमीफायनल गाठू, अशी आशा आहे.”
शेफर्डने स्पष्ट केले की त्यांच्या संघाने किमान 50 धावा कमी केल्या. तो म्हणाला, “जेव्हा फलंदाज बाद होत होते, तेव्हा ते सांगत होते की विकेट अतिशय चांगली आहे. मी स्वतः मैदानात उतरलो तेव्हाही ती खूप चांगली वाटली. पहिल्या काही चेंडूवर फलंदाजी करताना असं वाटलं जणू मी काँक्रीटवर खेळतोय.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला धक्का
सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 73 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयी मालिकेला खीळ बसली. आता वेस्टइंडीजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताला आपली खरी ताकद दाखवावी लागणार आहे.
टी-20 विश्वचषक 2026 साठी वेस्ट इंडिजचा संघ (वेस्ट इंडिज T20 विश्वचषक 2026 ) : शाई होप (कर्ंधर), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकेल होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, जयडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड.
टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ (India T20 World Cup 2026 ): सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.