IND VS WI: वेस्ट इंडिजचा सुपडा साफ, टीम इंडियाने 2-0 कसोटी मालिका जिंकली…

India vs West Indies 2nd Test: शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली आहे. गिलने इंग्लंड दौऱ्यात पहिल्यांदाच भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले. पाच सामन्यांच्या त्या मालिकेत भारत 2-2 अशी बरोबरी साधली असली तरी, टीम इंडियाने आता घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा 2-0 असा व्हाईटवॉश केला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारताने दुसरा कसोटी सामना सात विकेट्सने जिंकला शिवाय 2-0अशी मालिका जिंकली.

या सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 518/5 धावांवर डाव घोषित केला. यशस्वी जयस्वाल (175) आणि शुबमन गिल (129) यांनी पहिल्या डावात शतके झळकावली. साई सुदर्शननेही 87 धावा केल्या. दरम्यान, भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 248 धावांवर बाद केला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजकडून कुलदीप यादवने पाच विकेट्स घेतल्या. भारताकडे 270 धावांची आघाडी होती. परिणामी, भारताने फॉलो-ऑन लादला. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 390 धावा केल्या.

पहिल्या डावात 270 धावांनी पिछाडीवर असलेल्या वेस्ट इंडिजकडे 120 धावांची आघाडी होती आणि भारतीय संघाला विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजसाठी जॉन कॅम्पबेलने 115 धावा आणि शाई होपने 103 धावा केल्या. केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सामन्याच्या शेवटच्या दिवशी 121 धावांचे लक्ष्य केवळ तीन गडी गमावून गाठले. घरच्या मैदानावर गेल्या मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 140 धावांनी पराभव केला.

Comments are closed.