भारतविरुद्ध वेस्ट इंडिजचा उद्या कसोटी सामना रंगणार; टीम इंडिया कोणाला संधी देणार?, पाहा संभाव्य


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज चाचणी मालिका: आशिया चषकानंतर (Asia Cup 2025) आता टीम इंडिया वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारताची ही दुसरी कसोटी मालिका आणि 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतली पहिलीच घरच्या मैदानावरील कसोटी मालिका आहे.

टीम इंडिया पहिल्या कसोटीत तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवू शकते, ज्यामध्ये कुलदीप यादव फिरकी गोलंदाज असण्याची शक्यता आहे. तर वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोन अष्टपैलू खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. केएल राहुल आणि मोहम्मद सिराजसह अनेक प्रमुख खेळाडू कसोटी संघात परतणार आहे. ध्रुव जुरेलचा यष्टीरक्षक म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन- Team India Probably Playing XI:

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

खेळपट्टी कशी असेल?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळला जाईल. खेळपट्टीवर भरपूर गवत आहे, जे सामन्यापूर्वी आणखी कमी केले जाईल. लाल मातीची खेळपट्टी चांगली उसळी देते. या खेळपट्टीवर सुरुवातील वेगवान गोलंदाजांना मदत होईल. त्यानंतर फिरकीपटू वर्चस्व गाजवताना दिसतील. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावात सरासरी धावसंख्या 347 आहे आणि दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या 353 आहे. तिसऱ्या आणि चौथ्या डावात धावा करणे थोडे कठीण असू शकते. शनिवारी अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे खेळपट्टी बदलू शकते.

भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, एन. जगदीसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

वेस्ट इंडिजचा कसोटी संघ- (West Indies Full Squad)

रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, जोहान लेने, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स

संबंधित बातमी:

India vs West Indies: टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार; सामना कधी, कुठे अन् किती वाजता सुरु होणार?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.