IND Vs WI – वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेतून वॉशिंगटन सुंदरला वगळलं, BCCI ची घोषणा; कारण काय?
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या सुरू आहे. वनडे मालिका पार पडल्यानंतर उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी BCCI ने यापूर्वीच संघाची निवड केली असून वॉशिंगट सुंदरला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, आता या संपूर्ण मालिकेतून वॉशिंगटन सुंदरला वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सध्या वॉशिंगटन सुंदर Asian Games 2026 मध्ये टीम इंडियाकडून खेळत आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 6 ऑक्टोबर पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने वनडे मालिका जिंकली असून टी20 मध्येही वर्चस्व गाजवण्यासाचा संघाचा प्रयत्न असेल. मात्र, वॉशिंगट सुंदरला अचानक वगळण्यात आल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्याच कारण म्हणजे वॉशिंगटन सुंदर तंदुरुस्त असून आज (1 ऑक्टोबर 2026) ऐशियन गेम्समधील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती. मात्र, BCCI ने आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्याचा विचार करता त्याला टी20 मालिकेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Cricbuzz ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी20 मालिका पार पडल्यानंतर. टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला लक्षात घेता BCCI ने वॉशिंगटन सुंदरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेतून वगळलं आहे. वॉशिंगट सुंदरने कसोटी क्रिकेटकडे लक्ष द्याव आणि रणजीमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळावी जेणेकरून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला तयारी करता येईल. दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वॉशिंगट सुंदरच्या जागी नमन धीरची संघात निवड करण्यात आली आहे.
Comments are closed.