शुभमन गिल समोर नवं आव्हान, वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, भारताला रोखण्यासाठी विशेष रणनीती
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज चाचणी मालिका नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. या मालिकेतील दोन कसोटी सामने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनिमित्त खेळवले जाणार आहेत. यासाठी या मालिकेला महत्त्व आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजनंटीम जाहीर केली आहे. वेस्ट इंडिजच्या संघाचं रोस्टन चेज नेतृत्व करणार आहे. संघात नव्या आणि युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या पिचचा विचार करता वेस्ट इंडिजनं विशेष रणनीती राबवली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. यानंतर दुसरी कसोटी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये 10 ऑक्टोबरला होणार आहे. वेस्ट इंडिजनं या मालिकेसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडिज 2018 नंतर पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यावर कसोटीसाठी येणार आहे. काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियानं तीन सामने जिंकले होते. आता वेस्ट इंडिजनं संघात तीन बदल केले आहेत. शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेगनारायण चंद्रपॉल, एलिक अथानाजे यांच्याशिवाय फिरकी गोलंदाज खैरी पियरे याला संधी देण्यात आली आहे.
भारतातील पिचचा विचार करुन संघ निवड
वेस्ट इंडिजचा संघ जाहीर करताना क्रिकेट डायरेक्टर माइल्स बास्कोम्ब यांनी संघ निवडीबाबत भाष्य केलं. जे खेळाडू भारताविरूद्धच्या मालिकेसाठी निवडले गेले आहेत, त्यांची अलीकडची कामगिरी देखील लक्षात घेण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातील धिम्या पिचवर चांगली करु शकतात अशा खेळाडूंचा विचार करण्यात आला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत वेस्ट इंडिजची ही दुसरी मालिका आहे. यासाठी मजबूत टीम निवडण्यात आली आहे. जे भारतात त्यांना आव्हान देऊ शकतील. वेस्ट इंडिजचा संघ 22 सप्टेंबरला रवाना होईल भारतात 24 सप्टेंबरला अहमदाबादला पोहोचेल.
वेस्ट इंडिजचा संघ : रोस्टन चेज (कॅप्टन), जोमेल वारिकन (उप कॅप्टन ), केवलन अँडरसन, एलिक अथानाजे, जॉन कॅम्पबेल, तेगनरायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्स, शाई होप, टेविन इमलाच, अल्जारी जोसेफ, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खैरी पियरे, जेडन सील्स
आणखी वाचा
Comments are closed.