वेस्ट इंडिजने टॉस जिंकत भारताला दिलं गोलंदाजीचं आव्हान; प्लेइंग 11 मध्ये कोणाला मिळाली संधी?

आशिया कपचा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध आज, 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पाहुण्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या डावात गोलंदाजी करणार आहे.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळत आहे. याआधी इंग्लंड दौऱ्यात गिलने टीम इंडियाचं उत्कृष्ट नेतृत्व केलं होतं, ज्यामध्ये त्याने 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. नेतृत्वासोबतच त्याने फलंदाजीतही तितकंच मोलाचं योगदान दिलं.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): टॅगनारिन चंदरपॉल, जॉन कॅम्पबेल, ॲलिक अथानेस, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), रोस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खारी पियरे, जोहान लिन, जेडेन सील्स

Comments are closed.