भारताने दुसऱ्या वनडेत आयर्लंडचा पराभव करून मालिका जिंकली
दिल्ली: आयर्लंड महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर १२ जानेवारीला म्हणजेच रविवारी खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत 116 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने आयर्लंडसमोर 371 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले, ज्याचा पाठलाग करताना आयरिश संघ केवळ 254 धावाच करू शकला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने 50 षटकांत 5 गडी गमावून 370 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने उत्कृष्ट शतक झळकावत 102 धावा केल्या. सलामीवीर स्मृती मानधना (73) आणि प्रतिका रावल (67) यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भक्कम भागीदारी केली. हरलीन देओलने मधल्या फळीत ८९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आयर्लंडकडून गोलंदाजीत ओरल प्रेंडरेस्ट आणि आर्लेन केलीने 2-2 बळी घेतले, तर जॉर्जी डेम्पसीला 1 यश मिळाले.
या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली असून मालिका खिशात घातली आहे. मालिकेतील शेवटचा सामना याच मैदानावर १५ जानेवारीला होणार आहे. आता शेवटचा सामना जिंकून आयरिश संघ व्हाईटवॉश टाळण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या
Comments are closed.