भारतानं 102 वर 6 विकेट गमवाल्या, रिचा घोष गोलंदाजांवर तुटून पडली, द.आफ्रिकेसमोर मोठं आव्हान
विशाखापट्टणम : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने आले आहेत. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर भारताचा डाव कोसळला होता. भारतानं 102 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या रिचा घोषनं केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळं भारतानं 251 धावांचा टप्पा गाठला. रिचा घोषनं 94 धावा केल्यानं भारतानं 251 धावांपर्यंत मजल मारली.
भारताच्या डावाची सुरुवात चांगली होती. भारतानं पहिली विकेट 55 धावांवर गमावली होती. त्यानंतर भारतानं लगोलग विकेट गमावल्या. एकावेळी भारताची स्थिती 5 बाद 100 आणि त्यानंतर 6 बाद 102 अशी होती. यानंतर मैदानात फलंदाजीला आलेल्या रिचा घोषनं स्नेह राणा हिच्यासोबत आक्रमक फलंदाजी केली. रिचा घोषनं 11 चौकार आणि 4 षटकार मारले. रिचा घोषच्या 94 धावांच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 251 धावा केल्या.
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मानधना 23 धावांवर बाद झाली. यानंतर भारताच्या विकेट जाणं सुरु झालं. भारतानं 47धावात 6 विकेट गमावल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरची खराब कामगिरी सुरुच आहे, तिनं 9 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज एकही रन करु शकली नाही. दिप्ती शर्मा 4 धावा करुन बाद झाली.
Richa Ghosh : रिचा घोष फलंदाजीला आली अन् चित्र पालटलं
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताच्या 6 विकेट घेत मॅचवर पूर्ण वर्चस्व मिळवलं होतं. भारताची 6 बाद 102 अशी स्थिती झाली असताना रिचा घोष फलंदाजीला मैदानात आली. सुरुवातीला तिनं अमनजोत कौरसह 51 धावांची भागीदारी केली. अमनजोत कौर हिनं 44 बॉलचा सामना केला आणि 13 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या स्नेह राणानं जोरदार फटकेबाजी केली. स्नेह राणानं 24 बॉलमध्ये 33 धावा केल्या. दुसऱ्या बाजूनं रिचा घोषनं चौकार षटकार मारत 94 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडिया संकटात असताना रिचा घोषनं केलेली 94 धावांची खेळी ऐतिहासिक ठरली.
वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतानं आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. भारतानं श्रीलंकेला 59 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर पाकिस्तानला 88 धावांनी पराभूत केलं. आता रिचा घोषची ऐतिहासिक खेळी भारताला विजय मिळवून देते हा पाहावं लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.