IND-W vs WI-W: टीम इंडियाने रचला इतिहास, पहिल्या वनडे मध्ये केला मोठा पराक्रम
IND-W vs WI-W: भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. टी-20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला संघाने वनडे मालिकेलाही चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. या सामन्यातील विजयासोबतच संघाने एक विक्रमही केला. टीम इंडियाने हा सामना 211 धावांनी जिंकला. एकदिवसीय क्रिकेटमधील भारतीय संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. टीम इंडियाचा वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय हा आयर्लंडविरुद्ध आहे. तो सामना भारतीय महिला संघाने 249 धावांनी जिंकला होता.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.जो की भारतीय महिला संघाने त्यांचा निर्णय चुकीचा ठरवला आणि 50 षटकात 9 गडी गमावून 314 धावा केल्या. यादरम्यान टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने 91 धावांची शानदार खेळी केली. तिच्या खेळीमुळे टीम इंडियाने ही मोठी धावसंख्या उभारली. याशिवाय प्रतिका रावतने 40 आणि हरलीन देओलने 44 धावांची खेळी खेळली. शेवटी जेमिमाह आणि रिचा घोष यांनी वेगवान फलंदाजी करत टीम इंडियाला 300 धावांचा टप्पा पार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 315 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्याचा पाठलाग करताना संघ 26.2 षटकांत 103 धावांवर सर्वबाद झाला. या दरम्यान वेस्ट इंडिजच्या एकाही खेळाडूला 25 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. रेणुका सिंगने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 10 षटकात केवळ 29 धावा दिल्या आणि 5 विकेट्स घेतल्या. तिच्या शिवाय प्रिया मिश्राने दोन बळी घेतले. तर तीतस साधू आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान सामना रंगणार
IND vs AUS; माजी दिग्गजाने रोहित शर्माला दिला मोलाचा सल्ला! म्हणाला…
Year Ender 2024; यंदाच वर्ष ठरलं केकेआरसाठी खास, तिसऱ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव!
Comments are closed.