मराठमोळ्या सायलीचे पदार्पण आणि टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा केला 6 विकेटने पराभव
टीम इंडियाचा महिला संघ आणि आयर्लंड यांच्यामध्ये आज पासून तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मुंबईकर सायली सातघरेने आज हिंदुस्थानी संघात पदार्पण केले आहे. कर्णधार स्मृती मानधनाने मेडन कॅप देऊन सायलीचे संघामध्ये स्वागत गेले. यावेळी मुलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सायलीचे कुटुंबीयही उपस्थित होते. दरम्यान, टीम इंडियाने पहिला सामना 6 विकेटने जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
प्रथम फंलदाजी करताना आयर्लंडने 7 गड्यांच्या मोबदल्यात 238 धावा केल्या होत्या. गोलंदाजी करताना गोलंदाजी करताना प्रिया मिश्रा हिने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तर सायली, दिप्ती शर्मा आणि तैसा साधू यानी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. प्रत्त्युत्तरात टीम इंडियाचे संघाने 34.3 षटकांमध्ये आव्हानचा यशस्वी पाठलाग करत 6 विकटने विजय संपादित केला. टीम इंडियाकडून स्मृती मानधना (41 धावा), प्रतिका रावल (89 धावा), हर्लिन देवल (20 धावा) आणि जेमिमा (9 धावा) तसेच तेजलने 53 धावांची नाबाद खेळी करत संघाचा विजयाच महत्त्वापूर्ण भुमिका बजावली.
कोण आहे सायली सातघरे?
मुंबईतील बोरिवलीमध्ये वास्तव्याला असणाऱ्या सायलीचा जन्म 2 जुलै 2000 साली झाला. लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड असणाऱ्या सायलीला कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली. कुटुंबीयांची साथ आणि तिने घेतलेल्या मेहनतीमुळेच 2024 साली तिची महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये गुजरात जायंट्स संघात निवड झाली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तिने दमदार खेळ केला आहे. सायलीने 51 महिला लिस्ट ए सामने खेळले आहेत. या 51 सामन्यांमध्ये तिने 20.81 च्या सरासरीने 666 धावा चोपून काढल्या आहेत. मुंबईच्या संघातून खेळताना 2023-24 साली पार पडलेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय करंडकात सायलीने आपला डंका वाजवला. अरुणाचल प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात तिने नाबाद 100 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.
फक्त फलंदाजीच नाही तर आपल्या धारधार गोलंदाजीच्या जोरावत तिने 20.60 च्या सरासरीने 56 फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला आहे. पाच धावा दे 7 विकेट हा सायलीचा महिला लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पेल राहिला आहे. त्याच बरोबर टी-20 मध्ये तिने 49 सामने खेळले असून 19.05 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या आहेत. फलंदाजी आणि मोक्याच्या क्षणी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षणता सायलीमध्ये आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या संघात तिचे पदार्पन कुटुंबीयांसाठी आणि महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे.
Comments are closed.