INDA vs SAA: भारताचा डाव पहिल्याच दिवशी 255 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची 132* धावांची खेळी

ध्रुव जुरेलच्या शानदार शतकामुळे भारत अ संघाने गुरुवारी दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चार दिवसांच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी टॉप ऑर्डरच्या अपयशावर मात करत 255 धावा केल्या. फलंदाजीसाठी आलेल्या भारत अ संघाने 126 धावांत सात विकेट गमावल्या होत्या, परंतु जुरेल (नाबाद 132) आणि कुलदीप यादव (20) यांनी आठव्या विकेटसाठी 79 धावा जोडल्या. जुरेलने 175 चेंडूत 12 चौकार आणि चार षटकारांसह 126 धावा केल्या, तर कुलदीपने त्याच्या डावात 87 चेंडूंचा सामना करत 20 धावा केल्या.

जुरेलने ऑफ-स्पिनर प्रेनेलन सुब्रायनच्या चेंडूवर लाँगवर शानदार षटकार मारला. त्यानंतर त्याने त्याच गोलंदाजाला स्लॉग स्वीप मारला. त्याने व्हॅन वुरेनच्या चेंडूवर एक धाव घेऊन प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे चौथे शतक पूर्ण केले, जे गेल्या सात डावांमधील त्याचे तिसरे आहे. त्याने लखनौमध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध आणि अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतके केली होती. त्याआधी, साई सुदर्शन (17), केएल राहुल (19) आणि कर्णधार ऋषभ पंत (24) स्वस्तात बाद झाले.

दक्षिण आफ्रिका अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारत अ संघाची सुरुवात खराब झाली, नियमित अंतराने विकेट्स गमवाव्या लागल्या. भारत अ संघाची पहिली विकेट दुसऱ्या षटकात अभिमन्यू ईश्वरन (0) च्या रूपात पडली. फलंदाजीसाठी आलेल्या साई सुदर्शनने केएल राहुलसह डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला. 16व्या षटकात टियान व्हॅन वुरेनने केएल राहुल (19) ला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. पुढच्याच षटकात प्रेनेलन सुब्रायनने साई सुदर्शन (17) ला बाद केले.

ध्रुव जुरेल व्यतिरिक्त कोणताही भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाचा सामना करू शकला नाही. देवदत्त पडिक्कल (5) आणि कर्णधार ऋषभ पंत 24 धावांवर बाद झाला. हर्ष दुबे (14), कुलदीप यादव (20), आकाश दीप (0) बाद झाले. नवव्या विकेट म्हणून मोहम्मद सिराज 15 धावांवर बाद झाला. 78व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, टियान व्हॅन वुरेनने प्रसिद्ध कृष्णाला बाद केले आणि भारतीय डाव 255 धावांवर संपवला. ध्रुव जुरेलने 175 चेंडूत 12 चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 132 धावा केल्या. ज्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.

दक्षिण आफ्रिकेकडून टियान व्हॅन वुरेनने चार बळी घेतले. तर त्शेपो मोरेकी आणि प्रेनेलन सुब्रायनने प्रत्येकी दोन बळी घेतले.

Comments are closed.