टीम इंडिया विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज, ऋतुराजवर सर्वांचं लक्ष! प्रोटीज रोखणार?

इंडिया ए आणि साऊथ आफ्रिका ए यांच्यातील तीन अनऑफिशियल वनडे मॅचेसच्या मालिकेत भारतीय संघ अप्रतिम प्रदर्शन करत आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली आणि ऋतुराज गायकवाडच्या उपकर्णधारपदाखाली भारताने सलग दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता टीम इंडियाकडे सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकण्याची संधी आहे. या तिसऱ्या आणि अंतिम सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सामना कधी आणि कुठे?

भारत आणि साऊथ आफ्रिका ए यांचा अंतिम सामना बुधवारी, 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियम येथे खेळला जाईल. सामना दुपारी 1.30 वाजता सुरु होईल, तर टॉस 1 वाजता होईल.

हा सामना टीव्हीवर प्रसारित केला जाणार नाही. मात्र चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी की, तुम्ही हा सामना जिओहॉटस्टार एपवर मोबाईल किंवा लॅपटॉपवर लाईव्ह पाहू शकता.

भारताने 13 नोव्हेंबरला पहिला सामना 4 विकेट्सने आणि 16 नोव्हेंबरला दुसरा सामना 9 विकेट्सने जिंकला. या दोन्ही सामन्यात ऋतुराज गायकवाडने प्रमुख भूमिका बजावली. पहिल्या सामन्यात 117 धावा, दुसऱ्यात नाबाद 68 धावा.
त्याच्या या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला तिसरा सामना जिंकायचा असेल, तर ऋतुराजला लवकरात लवकर आऊट करणे आवश्यक आहे.

सामन्यातील शेवटची लढाई प्रत्येक चाहत्यासाठी रोमांचक ठरणार आहे. भारताची टीम सलग तिसरा विजय मिळवून मालिकेवर राज्य करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर ऋतुराज गायकवाडची चमक विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

Comments are closed.