वैभवसमोर जितेश शर्माची कामगिरी पडद्यामागे, 260च्या स्ट्राईकने केल्या धावा पण हुकलं शतक

एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील पहिला सामना भारत अ आणि युएई अ संघामध्ये रंगला. भारत अ संघाने तगडा सामना खेळला आणि युएई संघाला जोरदार धक्का दिला. या विजयामध्ये वैभव सूर्यवंशीने सर्वोच्च कामगिरी केली, तर कर्णधार जितेश शर्मानेही दमदार फटकेबाजी केली, पण वैभवच्या चमकदार खेळीमुळे त्याचं योगदान काहीसं झाकून राहिलं.

वैभव सूर्यवंशीने 342.86 40 च्या स्ट्राईक रेटने 42 चेंडूत 11 चौकार आणि 15 षटकारांसह 144 धावा केल्या, कोणताच गोलंदाज त्याला रोखू शकला नाही, जो कोण पुढे आला त्याला वैभवने धुतलं. या फटकेबाजीत भारताने 20 षटकांत 297 धावांवर मजल मारली.

या सामन्यात जितेश शर्मानेही चमक दाखवली, 32 चेंडूत नाबाद 83 धावा करत 259.38 च्या स्ट्राईक रेटने संघाला पाठिंबा दिला. त्याचं शतक थोडक्यात हुकलं, पण त्याची फटकेबाजी आणि आक्रमक शैली पाहून क्रिकेटप्रेमींमध्ये कौतुकाची लाट आली. खास करून 19 व्या षटकात त्याने युएईच्या मुहम्मद इरफानला ठोकत 26 धावा ठोकल्या.

विजयासाठी 297 धावांचा पाठलाग करताना युएई संघ 149 धावांवरच गारद झाला आणि भारताने 148 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारत 2 गुणांसह नेट रनरेट +7.400 ने स्पर्धेत आघाडीवर आहे.

पुढचा सामना भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारताला पुढील फेरीत जाण्याचा मार्ग सोपा होईल. त्यानंतर अंतिम फेरीत भारताचा सामना ओमानशी होईल.

Comments are closed.