आज शिवसेना भवन प्रांगणात ध्वजारोहण, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

देशाच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहन होणार आहे. यावेळी शिवसेना नेते , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित राहतील. सकाळी 8.30 वाजता हा सोहळा होईल.

15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी असंख्य देशभक्तांनी घरादारावर-कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून स्वतःला स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिले. देशासाठी प्राणांची आहुती दिली. शिवसेनेनेही देशाभिमान सदैव जपला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा झेंडा फडकावून देशाप्रति आदर व्यक्त केला जाणार आहे. ध्वजारोहन सोहळ्यासाठी शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, विभागप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Comments are closed.