ना अभिषेक, ना ईशान बाहेर, तरी संजू सॅमसनची एन्ट्री! टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक, 2 मोठे बदल अन्
भारत विरुद्ध झिम्बाब्वे सुपर-8 T20 विश्वचषक 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026चा थरार आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज अत्यंत महत्त्वाचा सामना रंगत आहे. उपांत्य फेरीची आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा मुकाबला ‘करो या मरो’सारखाच आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेपॉकच्या खेळपट्टीचा स्वभाव लक्षात घेता सुरुवातीला गोलंदाजी करत लक्ष्याचा पाठलाग करण्याची रणनीती झिम्बाब्वेने आखली आहे.
🚨 नाणेफेक 🚨#TeamIndia त्यांच्या दुसऱ्या सुपर 8 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले आहे!
अपडेट्स ▶️ https://t.co/p4GxtxGkBf#T20WorldCup | #मेनइनब्लू | #INDvWINTER pic.twitter.com/VMHTKSVPUC
— BCCI (@BCCI) 26 फेब्रुवारी 2026
भारताच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल
भारतीय संघ व्यवस्थापनाने या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. संजू सॅमसन याची रिंकू सिंगच्या जागी संघात पुनरागमन झाले आहे. सॅमसनकडून मधल्या फळीत वेगवान धावांची अपेक्षा असेल. उपकर्णधार अक्षर पटेल याला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी देण्यात आली आहे. अक्षरची अष्टपैलू कामगिरी संघाला संतुलन देऊ शकते. तर झिम्बाब्वेनेही आपल्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल केला आहे.
वर एक नजर #TeamIndiaच्या प्लेइंग इलेव्हन साठी #INDvWINTER स्पर्धा 🙌
अपडेट्स ▶️ https://t.co/p4GxtxGkBf#T20WorldCup | #मेनइनब्लू pic.twitter.com/CTXKP3bwIu
— BCCI (@BCCI) 26 फेब्रुवारी 2026
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन) : तदिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, आशीर्वाद मुझाराबानी, रिचर्ड नागरावा
भारत (प्लेइंग इलेव्हन) : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 मध्ये हेड-टू-हेड
2010 ते 2024 पर्यंत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या 13 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. भारताने 10 सामने जिंकले आणि फक्त 3 मध्ये पराभव पत्करला, ज्यामुळे त्यांचा विजयाचा टक्का 76.92 इतका झाला.
भारत आणि झिम्बाब्वेने टी-20 विश्वचषकात किती सामने खेळले?
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात भारत आणि झिम्बाब्वेने फक्त एकच सामना खेळला आहे, जो भारताने जिंकला. हा सामना 6 नोव्हेंबर 2022 रोजी मेलबर्नमध्ये खेळला गेला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.