टीम इंडियाने विजयाचा गुलाल उधळला; आशिया कपमध्ये भारताच्या लेकींनी पाकिस्तानला धूळ चारली

भारत अ ने पाकिस्तान अ महिला रायझिंग स्टार्स आशिया चषक 2026 चा पराभव केला: आज क्रिकेट विश्वाचे लक्ष कोलंबोकडे लागलेले असतानाच, भारताच्या युवा महिला ब्रिगेडने आधीच विजयाचा गुलाल उधळला आहे. एसीसी महिला रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये भारतीय महिला अ संघाने पाकिस्तान-अ संघाचा 8 विकेट्सनी पराभव केला. या विजयामुळे आज सायंकाळी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी चाहत्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे.

एसीसी महिला रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये पहिल्या सामन्यात यूएईकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत होती, मात्र या विजयाने संघाने जोरदार उत्तर दिले. या सामन्यात वृंदा दिनेश हिने अफलातून फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिने फक्त 29 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा ठोकल्या. तिच्या आक्रमक खेळीमुळे भारताने लक्ष्य सहज गाठले आणि स्पर्धेतील आपल्या विजयाचे खाते उघडले.

गोलंदाजांनी मोडले पाकिस्तानचे कंबरडे

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी सावरण्याची संधीच दिली नाही. अचूक टप्पा आणि भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संपूर्ण संघ 20 षटकेही खेळू शकला नाही. 18.5 षटकांत अवघ्या 93 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. भारतासमोर विजयासाठी 94 धावांचे किरकोळ लक्ष्य होते.

वृंदा दिनेशची वादळी अर्धशतक…

94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर वृंदा दिनेशने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. तिने अवघ्या 29 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची स्फोटक खेळी केली. वृंदाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भारताने 11 व्या षटकातच विजय मिळवला.

आता लक्ष कोलंबोकडे, सायंकाळी 7 वाजता हाय-व्होल्टेज ड्रामा!

महिला संघाने मिळवलेल्या या विजयाने भारतीय चाहत्यांना जणू विजयाची नांदी दिली आहे. आज 15 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे मुख्य संघ आमनेसामने येणार आहेत.

हे ही वाचा –

T20 World Cup 2026  : पॉइंट्स टेबलमध्ये भूकंप! वेस्ट इंडिजची गाडी सुसाट, विजयी हॅट्रिक अन् सुपर-8 चं पहिलं तिकीट कन्फर्म, कोणाचा पत्ता कट?

आणखी वाचा

Comments are closed.