ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध पंजाबच्या या खेळाडूची शानदार शतकी कामगिरी, ऑस्ट्रेलियासाठी ठरला डोकेदुखी

भारत A आणि ऑस्ट्रेलिया A यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली . ऑस्ट्रेलिया ए संघाचा पराभव करत भारत ए संघाने ही मालिका जिंकली. मालिकेचा तिसरा सामना कानपुरमध्ये झाला. या सामन्यात भारताकडून प्रभसिमरन सिंगने (Prabhsimran Singh) कमाल कामगिरी केली. त्याने 150 च्या स्ट्राइक रेटने शतक ठोकले. याआधीही प्रभसिमरने आईपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ससाठी चांगली कामगिरी केली होती. तिसऱ्या वनडेतही त्याने आईपीएलमधली झलक दाखवत तुफानी शतक ठोकले.

या सामन्यात प्रभसिमरन सिंगने सलामी फलंदाज म्हणून खेळी केली. त्याने अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सोबत डाव सांभाळला, पण अभिषेक त्याला जास्त वेळ साथ देऊ शकला नाही. तरीही प्रभसिमरन सिंगने डाव एका टोकावर ठामपणे सांभाळला. त्याने 68 चेंडूत 102 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 7 षटकार समाविष्ट होते. त्याचा स्ट्राइक रेट 150 होता.

पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया A ने 49.1 षटकामध्ये 316 धावा केल्या. त्याच्या संघातून कूपर कोनोलीने 49 चेंडूत 64 धावा आणि जॅक एडवर्ड्सने 75 चेंडूत 89 धावा केल्या. जॅकने 8 चौकार आणि 3 षटकार लगावले.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इंडिया ए संघाने ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध शानदार विजय मिळवला आहे.

Comments are closed.