भारत-अफगानिस्तान वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक! विराट आणि रोहित कधी मैदानात उतरणार?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका लवकरच सुरू होत आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये एक कसोटी आणि तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. 2018 नंतर पहिल्यांदाच भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामना होणार आहे, तर वनडे मालिका दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच खेळली जाणार आहे.
ही मालिका ऐतिहासिक ठरणार आहे. वनडे मालिकेत विराट कोहली खेळताना दिसणार आहे. मात्र, रोहित शर्माचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. या दौऱ्यावर आधी कसोटी सामना होईल आणि त्यानंतर वनडे मालिका खेळली जाईल.

सामन्यांचे वेळापत्रक

एकमेव कसोटी सामना: 6 ते 10 जून, न्यू चंडीगड येथे खेळला जाईल. न्यू चंडीगडच्या मैदानावर होणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल. 2018 मध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एका डावाने आणि 262 धावांनी विजय मिळवला होता.

पहिला वनडे (ODI): 13 जून, धर्मशाला.
दुसरा वनडे (ODI): 17 जून, लखनऊ.
तिसरा आणि शेवटचा वनडे (ODI): 19 जून, चेन्नई.

भारतीय संघ:
कसोटी संघ: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर बराड, हर्ष दुबे आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

वनडे संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, प्रिंस यादव, गुरनूर बराड आणि हर्ष दुबे.

Comments are closed.