Opertion Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची एअर वॉर्निंग सिस्टीम (AWACS) केली नष्ट

पंजाब, राजस्थान आणि जम्मूमध्ये पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याला हिंदुस्थानने अतिशय प्राणघातक आणि योग्य उत्तर दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लाहोर आणि इस्लामाबाद हे भारतीय क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, हिंदुस्थानने पाकिस्तानच्या दोन शहरांवर, ज्यांना देशाचे हृदय म्हटले जाते, सर्वात शक्तिशाली हल्ला केला आहे.
या हल्ल्याची भीषणता अद्याप समोर आलेली नाही. पाकिस्तानच्या चिथावणीखोर कृतींना हिंदुस्थान आता योग्य उत्तर देत आहे. जम्मूमधील नागरी भागांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न करण्यात आला.
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर हिंदुस्थाननेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या दिशेने अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. हिंदुस्थानने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाल्याचे सांगितले जात आहे. कराची, लाहोर, इस्लामाबादमध्ये क्षेपणास्त्रे डागलेली असून, अजून याबाबतचा तपशील समोर आला नाही.
हिंदुस्थानने पाकिस्तानची एअर वॉर्निंग सिस्टीम (AWACS) प्रणाली नष्ट केली आहे. पाकिस्तानातील तीन प्रमुख शहरे, कराची, इस्लामाबाद आणि लाहोर भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईला सामोरे जात आहेत. त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे.
Comments are closed.