Champions Trophy: भारत-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये! यजमान पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा (ICC Champions Trophy 2025) उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान यजमान पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण न्यूझीलंडने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. यासह, संघाने स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

न्यूझीलंडच्या विजयाचा भारतालाही फायदा झाला आहे कारण हे दोन्ही संघ थेट अंतिम-4 मध्ये पोहोचले आहेत. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 236 धावा केल्या, प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने 23 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले.

रावलपिंडी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेश प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. जणू काही कर्णधार नझमुल शांतो आज आपल्या संघाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरला होता. तन्जीद हसन, मेहदी हसनपासून ते गेल्या सामन्यातील शतकवीर तौहीद हृदयॉयपर्यंत, सर्वजण सतत बाद होत राहिले.

परंतु, कर्णधार शांतो एका मजबूत भिंतीसारखा उभा राहिला आणि किवी संघाला त्रास देत राहिला. त्याने 77 धावांची प्रेशर इनिंग खेळली. 7व्या आणि 8व्या स्थानावर असलेल्या झाकीर अली रिशाद हुसेनने अनुक्रमे 45 आणि 26 धावा केल्या. जर हे डाव झाले नसते, तर बांगलादेश 200 पेक्षा कमी धावांमध्येच संपला असता.

237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली कारण विल यंग (Will Young) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) 15 धावांवर असताना पॅव्हेलियनमध्ये परतले. पण तिथून, रचिन रवींद्रने (Rachin Ravindra) जबाबदारी स्वीकारली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यात शतकासह 112 धावा केल्या. त्याच्याशिवाय टॉम लॅथननेही (Tom Latham) 55 धावांची महत्त्वाची खेळी खेळली.

जर बांगलादेशने न्यूझीलंडवर विजय मिळवला तरच बांगलादेश आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल फेरीत टिकू शकले असते. पण तसे झाले नाही. आता बांगलादेश आणि पाकिस्तानने त्यांचे दोन्ही सामने गमावले आहेत. भारत आणि न्यूझीलंडचे गट अ मध्ये प्रत्येकी 4 गुण आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर पडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

तेंडुलकरचे वनडेमधील 5 विश्वविक्रम, जे विराट कोहली कधीही नाही मोडू शकणार!
दुबईतील पराभवानंतर चाहत्याची भावना – “ICC, भारत-पाकिस्तानला वेगळ्या गटात टाका!”
रोहित शर्मानंतर भारताचा भावी कर्णधार कोण? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

Comments are closed.