भारत ऑस्ट्रेलियासोबत टी20 मालिका खेळणार! सामने कुठे आणि केव्हा होणार जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या (Ind vs aus) दरम्यान 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ टी20 मालिकाही खेळतील. भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिका (IND vs AUS T20 Series) 29 ऑक्टोबरपासून कॅनबरा येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यासह सुरू होईल.
टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी काही खेळाडू फक्त वनडे मालिकेनंतर टी20 संघात सामील होतील, तर इतर खेळाडू मालिकेच्या सुरू होण्याआधी कॅनबरा पोहोचले आहेत.
टी20 मालिकेसाठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर.
T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ: मिचेल मार्श (विकेटकीप), सीन एबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशिस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मॅथ्यू कुह्नेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोआनी.
मालिकेची सुरुवात: 29 ऑक्टोबर
अंतिम सामना: 8 नोव्हेंबर
पहिला सामना – 29 ऑक्टोबर, कॅनबरा
दुसरा सामना – 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरा सामना – 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथा सामना – 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवा सामना – 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियात भारताच्या वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माऐवजी शुबमन गिल (Shubman gill) करीत आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने संपले आहेत आणि भारताला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-0 ने पुढे आहे. मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना सिडनीत होईल.
Comments are closed.