IND vs ENG – 8 वर्षांनी कमबॅक केलं अन् सामन्याआधी जायबंदी झाला, बरगड्यांवर चेंडू आदळल्यानं स्टार फलंदाजाला दुखापत

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही उभय संघात पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या लीड्स येथे रंगणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्याशिवाय हिंदुस्थानचा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. मात्र या लढतीपूर्वी शुभमन गिल याच्या चिंतेत वाढ झाली असून तब्बल 8 वर्षानंतर कमबॅक केलेल्या करुण नायरला नेट्समध्ये सराव करताना दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे.
करुण नायर याने तब्बल 8 वर्षानंतर कमबॅक केले आहे. विरेंद्र सेहवाग याच्यानंतर त्रिशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरलेला करुण नायर इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियासाठी हुकुमी एक्का ठरण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या तीन सराव लढतीत त्याने 259 धावा चोपत आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र आता लीड्समध्ये होणाऱ्या पहिल्या लढतीपूर्वी त्याला दुखापत झाली आहे. नेट्समध्ये सराव करताना वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याचा चेंडू त्याच्या बरगड्यांवर लागल्याने त्याला दुखापत झाली.
Comments are closed.