सेमीफायनलसाठी 4 संघ ठरले, टीम इंडियाच्या विजयानंतर वर्ल्डकप पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ
महिला विश्वचषक 2025 गुण सारणी : महिला वनडे विश्वकप 2025 मधील एका अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या सामन्यात भारताने कीवी संघाचा 53 धावांनी पराभव करत 2 गुण मिळवले आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आपली पकड कायम ठेवली.
भारताची सेमीफायनलमध्ये धडक (India beat New Zealand to seal semi-final spot)
या विश्वकपमध्ये भारताने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. आता भारताकडे एकूण 6 गुण झाले असून टीम इंडियाने या कामगिरीच्या जोरावर सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. भारत हा या स्पर्धेतील चौथा संघ ठरला आहे ज्याने टॉप-4 मध्ये स्थान मिळवले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी सेमीफायनलमध्ये जागा पक्की केली होती.
📸📸
गोड विजयाचे खास क्षण! 🥳#TeamIndia न्यूझीलंडवर 5️⃣3️⃣ धावांनी (DLS पद्धत) विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश करा 💪
स्कोअरकार्ड ▶ https://t.co/AuCzj0Wtc3#WomenInblue | #CWC25 | #INDvNZ pic.twitter.com/qGrCieRLj8
— BCCI महिला (@BCCIWomen) 23 ऑक्टोबर 2025
ऑस्ट्रेलिया अव्वल (ICC महिला विश्वचषक 2025 गुण सारणी)
भारत-न्यूझीलंड सामन्यातील पराभवानंतर कीवी संघाचं सेमीफायनलचं स्वप्नही संपुष्टात आलं आहे. सध्याच्या गुणतालिकेनुसार ऑस्ट्रेलिया 11 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड 10 गुणांसह दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिका 9 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान फक्त 2 गुणांसह शेवटच्या म्हणजे आठव्या क्रमांकावर असून सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघही टॉप-4 च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुरुवारी (23 ऑक्टोबर) डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडवर DLS पद्धतीनुसार 53 धावांनी विजय मिळवला. सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या शतकांमुळे भारताने विजय निश्चित केला. प्रतिका रावलने 134 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 122 धावा केल्या, तर स्मृती मानधनाने 95 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांसह 109 धावा ठोकल्या. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 201 चेंडूंमध्ये 212 धावांची भक्कम भागीदारी केली, ज्यामुळे भारताने 340 धावांचा डोंगर उभारला. सामन्यादरम्यान पावसाने अडथळा आणला, त्यामुळे भारताला 49 षटकांचीच फलंदाजी करता आली. त्यानंतर DLS नियमांनुसार न्यूझीलंडसमोर 44 षटकांत 325 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र, कीवी संघ 44 षटकांत 8 गडी गमावून फक्त 271 धावांपर्यंतच पोहोचू शकला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.