भारताकडून लाजिरवाणा पराभव; शाहिद आफ्रिदीचा संताप, जावयालाही नको नको बोललो, पाकिस्तान क्रिकेटमध्
IND vs PAK, पाकिस्तान संघावर शाहिद आफ्रिदी : कोलंबो येथे रंगलेल्या भारत–पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला तब्बल 61 धावांनी पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने थेट आपल्या संघावर, आणि विशेषतः आपल्या जावई शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) तसेच बाबर आजम (Babar Azam) टीका करत खळबळजनक विधान केले आहे.
शाहिद आफ्रिदी संतापला, पाकिस्तानी खेळाडूंना नको नको ते बोललो…
पाकिस्तानी न्यूज चॅनलवर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “शाहीन, बाबर आणि शादाबला बाहेर करा. मोठ्या सामन्यांमध्ये त्यांनी वारंवार निराशाजनक कामगिरी केली आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी द्या आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवा.”
शाहिद आफ्रिदी म्हणाला, “शाहीनला टाका, शादाबला टाका आणि बाबरला टाका. त्यांनी आम्हाला महत्त्वाच्या मोठ्या सामन्यांमध्ये नेहमीच निराश केले आहे. नामिबियाविरुद्ध नव्या चेहऱ्यांचा प्रयत्न करा आणि नवीन खेळाडूंना आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी द्या”.pic.twitter.com/6JPFIuKy0O
– सलमान. (@TsMeSalman) १५ फेब्रुवारी २०२६
आफ्रिदी पुढे म्हणाला, “जर निर्णय माझ्या हातात असता, तर मी शाहीन, बाबर आणि शादाबला संघाबाहेर ठेवले असते. वरिष्ठ खेळाडू जर सातत्याने अपयशी ठरत असतील, तर नव्या खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे. आपण इतक्या काळापासून पाहतोय की हेच खेळाडू खेळत आहेत, पण अपेक्षित कामगिरी होत नाही. आता नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्याची वेळ आली आहे.”
भारताविरुद्ध शाहीन आफ्रिदी अन् बाबर आजमची कामगिरी (Shaheen Afridi and Babar Azam vs India)
भारताविरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदी याने फक्त 2 षटकांत 31 धावा दिल्या. दुसरीकडे बाबर आजमला अवघ्या 5 धावांवर समाधान मानावे लागले. त्याला अक्षर पटेल याने बोल्ड करून माघारी पाठवले. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर टीकेची झोड उठली असून, आगामी नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघरचनेत बदल होण्याची शक्यता आता चर्चेत आली आहे.
भारत–पाकिस्तान वर्ल्डकप सामना कसा राहिला? (India vs Pakistan T20 World Cup 2026)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले.
भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.