हिंदुस्थानने चौथ्यांदा आशिया करंडक जिंकला; अंतिम लढतीत दक्षिण कोरियाचा 4-1 ने धुव्वा, हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचेही तिकीट मिळविले

यजमान हिंदुस्थानने संपूर्ण स्पर्धेत अजेय राहत आशिया करंडक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. जेतेपदाच्या लढतीत सर्वाधिक पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या गतविजेत्या दक्षिण कोरियाचा 4-1 गोलफरकाने धुव्वा उडवित हिंदुस्थानने चौथ्यांदा हा झळाळता करंडक उंचावण्याचा पराक्रम केला. याचबरोबर हिंदुस्थानी संघाने 2026मध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कपचेही तिकीट बुक केले, हे विशेष.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करून हिंदुस्थानला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंगने आणखी एक गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी वाढविली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पुन्हा दिलप्रीतने गोल करून आघाडी 3-0 अशी भरभक्कम केली. चौथ्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत हिंदुस्थानला 4-0 ने आघाडीवर नेत जेतेपद जवळपास निश्चित केले. दक्षिण कोरियाकडून सोन डायनने एकमेव गोल केला.
याआधी हिंदुस्थायनने 2017 मध्ये मलेशियाला पराभूत करून शेवटचा किताब जिंकला होता. कोरियाला केवळ दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2007 मध्येही हिंदुस्थाननेच कोरियाला अंतिम फेरीत हरवले होते. हिंदुस्थानने नवव्यांदा, तर दक्षिण कोरियाने सातव्यांदा आशिया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. शेवटी या दोन बलाढय़ संघांमध्ये झालेल्या अंतिम लढतीत यजमान हिंदुस्थानने निर्विवाद वर्चस्व गाजवित संपूर्ण स्पर्धेत अजेय राहत मोठय़ा रूबाबात आशिया चषकावर आपले नाव कोरले.
हिंदुस्थानची आशिया करंडकातील कामगिरी
एन विजेते: 2003, 2007, 2017, 2025
(एकूण चार वेळा)
एन धावपटू -अप: 1982, 1985, 1989, 1994, 2013
(पाच वेळा)
n तिसरे स्थान ः 1999, 2022
(दोन वेळा)
Comments are closed.