मुक्त व्यापार करारावर भारत-ब्रिटन सहमत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आनंद व्यक्त : ऐतिहासिक कामगिरी असल्याचे उद्गार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि ब्रिटन मंगळवारी मुक्त व्यापार करारावर सहमत झाले आहेत. यानंतर दोन्ही देशांनी एका व्यापक क्यापार कराराची घोषणा केली असून तो बहुतांश उत्पादने आणि सेवांवरील आयातशुल्क हटविण्याची तरतूद करतो. हे पाऊल भारत आणि अमेरिकेसह अन्य देशांदरम्यान अशाचप्रकारच्या करारांसाठी वाट मोकळी करणारे ठरू शकते. ब्रिटनसोबतच्या करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत याला ऐतिहासिक कामगिरी संबोधिले आहे. या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान रणनीतिक भागीदारी अधिक मजबूत होणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.

भारत आणि ब्रिटनने बहुप्रतीक्षित मुक्त करार करार आणि दुहेरी योगदान करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार आमच्या व्यापक रणनीतिक भागीदारीला वृद्धींगत करेल आणि आमच्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, विकास, रोजगार निर्मिती आणि नवोन्मेषाला चालना देणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांना भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे.

पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याशी संवाद साधून आनंद झाला. एका ऐतिहासिक कामगिरीच्या स्वरुपात भारत आणि ब्रिटनने एक महत्त्वाकांक्षी आणि परस्पर स्वरुपात लाभदायक मुक्त करारासोबत एका दुहेरी योगदान कराराला मान्यता दिली आहे. हे ऐतिहासिक करार आमच्या व्यापक रणनीतिक भागीदारीला आणखी मजबूत करतील, तसेच आमच्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, रोजगार निर्मिती, आणि नवोन्मेषाला चालना देतील. पंतप्रधान स्टारमर यांचे भारतात स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदींनी ट्विट करत म्हटले आहे.

Comments are closed.