भारतीय संघ चॅम्पियन्स होऊ शकतो पण, माजी खेळाडूंनी काय सांगितला फॉर्म्युला ?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सामोरा समोर असणार आहेत. तत्पूर्वी भारतीय संघाने अ गटातील सामन्यात बांगलादेश शिवाय पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांना पराभूत केले. आता भारतीय संघ उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करेल? रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाला हरवणे भारतासाठी किती मोठ चॅलेंज आहे? या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता यांनी. दीप दासगुप्ता यांचं असं म्हणणं आहे की, भारतीय संघाकडे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची चांगली संधी आहे, यात काही शंका नाही. तसेच भारतीय फलंदाजांशिवाय गोलंदाज शानदार कामगिरी करत आहेत.

दीप दासगुप्ता म्हणाले, आता खऱ्या रीतीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाने त्यांचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळला. यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. भारताच्या दोन सामन्यानंतर न्यूझीलंडने आव्हान दिल्यानंतर भारतीय संघाने त्यांचा देखील पराभव केला. त्यामुळे भारताची सुरुवात आता झाली आहे. दीप दासगुप्ता यांचं मानणं आहे की, भारतीय संघाकडे चांगली संधी तर आहेच,nपण पुढचा रस्ता अवघड असणार आहे. ते असंही म्हणाले जर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची असेल तर त्यांनी विरुद्ध संघाचा विचार करू नये.

तसेच आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये 151 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 84 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने 57 सामने जिंकले आहेत. आकडे स्पष्ट आहेत की वनडे फॉरमॅटमध्ये भारताच्या विरोधात ऑस्ट्रेलिया संघाचं पारडं जड आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया पैकी कोणत्या संघाच पारडं जड आहे? आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताचा दोन वेळा ऑस्ट्रेलियाशी सामना झाला आहे. दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. तसेच एका सामन्यादरम्यान पावसामुळे सामना झाला नाही. याशिवाय आयसीसी वनडे सामन्यात नॉकआऊट सामन्यात भारत ऑस्ट्रेलिया 6 वेळा समोरासमोर आले आहेत.

हेही वाचा

“रोहित शर्मा भारताचा सर्वात वाईट कर्णधार आहे…” काँग्रेस पक्षाच्या शमा मोहम्मदचे वादग्रस्त वक्तव्य!

Champions Trophy: विराट कोहली अक्षर पटेलच्या पाया का पडला? कारण काय?

न्यूझीलंड विजयाच्या वाटेवर तोच ‘बापू’चा चेंडू फिरला आणि किवीचा खेळ संपला..!

Comments are closed.