सुपर-8 आधी मास्टरस्ट्रोक, भारताने टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय; प्लेइंग-11 मध्ये 2 बदल
भारत विरुद्ध नेदरलँड T20 विश्वचषक 2026 : भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 36वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेदरलँड्स संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या अंतिम अकरामध्ये दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. कुलदीप यादवला अंतिम अकरातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याची पुनरागमन झाले आहे. तसेच अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुंदर या स्पर्धेत प्रथमच खेळताना दिसणार आहे.
🚨 नाणेफेक 🚨#TeamIndia नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अपडेट्स ▶️ https://t.co/SdXngdnwKB#T20WorldCup | #मेनइनब्लू | #INDvNED pic.twitter.com/IE7vC5rhgU
— BCCI (@BCCI) 18 फेब्रुवारी 2026
कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. विकेट चांगली दिसते आहे. आधी धावा फलकावर लावून प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकायचा, जेणेकरून गोलंदाजांना एकूण धावसंख्या बचावता येईल. संघातील वातावरण अतिशय सकारात्मक आहे आणि खेळाडू आम्हाला अपेक्षित असलेला क्रिकेटचा ब्रँड खेळत आहेत. प्रत्येक सामन्यात कुणीतरी पुढे येत जबाबदारी स्वीकारतोय, हे पाहून आनंद वाटतो. आज संघात दोन बदल केले आहेत, कुलदीपच्या जागी अर्शदीप आला आहे. अक्षरला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे.”
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : ईशान किशन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
सादर करत आहे #TeamIndiaअहमदाबादमधील स्पर्धेसाठी प्लेइंग इलेव्हन 👌
अपडेट्स ▶️ https://t.co/SdXngdnwKB#T20WorldCup | #मेनइनब्लू | #INDvNED pic.twitter.com/KYEpYmugHX
— BCCI (@BCCI) 18 फेब्रुवारी 2026
नेदरलँड्स संघाची प्लेइंग इलेव्हन : मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन अॅकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टिरक्षक), झॅक लायन-कॅशे, नोआ क्रोस, रूलोफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.