मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला अन् संजूला जा जा जा करणाऱ्या अबरार अहमदची टीम इंडियाने इज्जत काढ
इंडिया क्रिकेट्स ट्रोल ओपन अहमद : आशिया कप जिंकण्यासाठी टीम इंडिया (Asia Cup 2025 Final 2025 Trophy) मैदानात उतरली होती आणि तिने ट्रॉफी आपल्या नावावर करून ते सिद्धही केले. पण पाकिस्तानची टीम जणू स्वतःची फजिती करून घ्यायला आली होती आणि भारतीय खेळाडूंनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डचे प्रमुख मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) असोत किंवा त्यांचे खेळाडू सगळ्यांनी स्वतःच आपले हसे करून घेतले.
मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला अन्… (Mohsin Naqvi Runs Away With Asia Cup Trophy)
दुबईत रविवारी, 28 सप्टेंबरला भारतीय संघाने (Team India) अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया कपवर (Asia Cup 2025 Final 2025 Trophy) नाव कोरलंय. तिलक वर्मा (Tilak Verma) भारताच्या विजयाचा हिरो ठरला. सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभातच वाद निर्माण झाला. भारतीय संघाने ACC आणि PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. ज्यावरून वाद झाला, आणि मोहसीन नक्वी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन गेले. दरम्यान संजूला जा जा जा करणाऱ्या अबरार अहमदची टीम इंडियाने इज्जत काढली, ज्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
अब्रार अहमदची प्रतिक्रिया 🤡
संजू सॅमसन आणि त्याच्या मित्रांची प्रतिक्रिया 🤣pic.twitter.com/vgpknk4m9g
– क्रिक्साचिन (@सचिन_गंधी 7) सप्टेंबर 29, 2025
संजूला जा जा जा करणाऱ्या अबरार अहमदची टीम इंडियाने इज्जत काढली… (Indian Players Troll Pakistan’s Abrar Ahmed)
सामन्यानंतर, भारताचा वेगवान गोलंदाज स्पर्धेत भारताचा सर्वाधिक बळी घेणारा अर्शदीप सिंगने इंस्टाग्रामवर अबरार अहमदच्या सेलिब्रेशनची नक्कल करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये जितेश शर्मा आणि हर्षित राणा त्याच्यासोबत होते, तर संजू सॅमसन हसत हसत जवळ उभा होता. झाले असे की, संजू सॅमसन आऊट झाल्यानंतर अबरार अहमदने असे सेलिब्रेशन केले होते. त्यामुळे भारतीय खेळाडू अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि जितेश शर्मा यांनी पाकिस्तानच्या फिरकीपटू अबरार अहमदला जोरदार ट्रोल केले. विकेट घेतल्यानंतर अहमद ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करतो, त्याची अशी खिल्ली उडवली की किमान भारताविरुद्ध तो पुन्हा असा प्रकार करणार नाही. काही सेकंदांचा क्षणातच व्हायरल झाला आहे.
हे नेक्स्ट लेव्हल ट्रोलिंग आहे!
जितेश, आर्शदीप आणि हरशीट ट्रॉल्स पाकिस्तानी अब्रार 🤣 #ASIACUPFINAL pic.twitter.com/s0ylzeksse
– एप्रिलवा सिंग (@इझिंगहापुरवा) 28 सप्टेंबर, 2025
टीम इंडियाने नवव्यांदा विजेतेपद पटकावले
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 19.1 षटकांत 146 धावा केल्या. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 57 धावा केल्या. फखर जमाननेही 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 4 बळी घेतले. भारतीय संघाने 19.4 षटकांत 5 बळी गमावून हे लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून तिलक वर्माने सर्वाधिक 69 धावा केल्या, तर शिवम दुबेने
33 धावा केल्या. टीम इंडियाने 9व्यांदा आशिया कप विजेतेपद पटकावले आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.