भारताने संयुक्त राष्ट्र संघावर टीका केली आहे

नवी दिल्ली :

दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर संयुक्त राष्टसंघाच्या मानवाधिकार संघटनेने टिप्पणी केली आहे. भारताने या टिप्पणीवर कठोर टीका केली असून हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी स्पष्टोक्ती केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या संस्थेने भारतातील घटनांमध्ये लक्ष देण्याचे कारण नाही. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहे. मतभेदांना कसे सामोरे जायचे, हे भारताच्या प्रशासनाला माहीत आहे. भारताची घटना शांततेत होणाऱ्या निदर्शनांना अनुमती देते. तथापि, हिंसक आणि बेकायदेशीर प्रकारांना अनुमती देत नाही. आमच्या देशातील परिस्थिती हाताळण्यास आम्ही समर्थ आहोत. मानवाधिकार संस्थेला आमच्या अंतर्गत व्यवहारात लक्ष घालण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन करण्यात आले.

Comments are closed.