IND vs AUS: बदला पूर्ण! ऑस्ट्रेलियाच्या चारी मुंड्या चीत! भारताची फायनलमध्ये धडक…!
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये धुमधडाक्यात प्रवेश केला. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताने 11 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका विराट कोहलीने (Virat Kohli) बजावली. त्याने सर्वाधिक 84 धावा केल्या.
भारतीय संघाने दुबईमध्ये सलग चौथा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय बऱ्याच प्रमाणात चांगला ठरला. दुबईच्या मैदानावर 250 धावांचा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलिया हा या स्पर्धेत पहिला संघ ठरला. असे असूनही, तो 265 धावांचे लक्ष्य राखण्यात अपयशी ठरला. दुबईच्या मैदानावर 250 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठणारा भारत आता जगातील केवळ चौथा देश बनला आहे.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याची हॅटट्रिक लगावली आहे. यापूर्वी भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. 2017 मध्येही भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला होता, पण यावेळी भारताला पाकिस्तानकडून 180 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. आता भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना खेळणार आहे.
भारताने आतापर्यंत 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना (9 मार्च) रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS: निर्णायक सामन्यात विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी! अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज
रोहित शर्माच्या विकेटने रितिका भावूक, तिची प्रतिक्रिया पाहून चाहतेही भावनिक!
गिलचा निर्णायक सामन्यात पुन्हा फ्लॉप शो; उपकर्णधारपद धोक्यात..!
Comments are closed.