IND vs AUS: कांगारूंची कंबर मोडली! भारताच्या विजयाचे 3 सर्वात मोठे हीरो
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल 1) संघात खेळला गेला. दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून धूळ चारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिग्गज विराट कोहलीने (Virat Kohli) 84 धावांची शानदार खेळी केली. दरम्याने त्याने सामनावीर पुरस्कार देखील पटकावला.
त्याआधी, भारतीय गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखले. या विजयात संपूर्ण संघाचे योगदान होते. भारतीय संघाने आपली प्रभावी कामगिरी दाखवत यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तत्पू्र्वी या बातमीद्वारे आपण त्या 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, जे सेमीफायनल सामन्यातील विजयाचे सर्वात मोठे हिरो ठरले. (India vs Australia Semifinal 1)
3) मोहम्मद शमी- भारतीय संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी करत आहे. त्याने सेमीफायनलमध्ये आपला अनुभव दाखवून दिला. त्याने डावातील पहिली विकेट कूपर कॉनोलीची घेतली. स्टीव्ह स्मिथ सेट झाल्यानंतर शमीने त्याचा त्रिफळा उडवून त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि भारताला पुन्हा गेममध्ये आणले. या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
२) हार्दिक पांड्या- विराट बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 44 चेंडूत 40 धावांची आवश्यकता होती. अशा दबावाच्या परिस्थितीत काही डॉट बॉलमुळे भारतीय संघावर दबाव वाढू शकला असता. पण पांड्या नेहमीप्रमाणेच लयीत दिसत होता, त्याने स्फोटक खेळी केली आणि सामना जलद संपवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. हार्दिकने 24 चेंडूत 28 धावांची जलद खेळी केली. जिथे इतर फलंदाजांना चौकार मारणे कठीण होते, तिथे हार्दिकने 3 गगनचुंबी षटकार मारले.
1) विराट कोहली- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा हा संयुक्त सर्वात मोठा विजय आहे. पण विराट कोहलीमुळेच हे लक्ष्य सहज साध्य झाले. रोहित शर्मा (28) आणि शुबमन गिल (8) बाद झाल्यानंतर भारतीय संघावर दबाव वाढला. नंतर कोहलीने श्रेयस अय्यरसोबत 91 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर अक्षर पटेलसोबत 44 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघावरील दबाव कमी झाला आणि सहज विजय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला.
विराट आपल्या खेळीत मोठ्या फटक्यांवर अवलंबून राहिला नाही. त्याने एकेरी आणि दुहेरी धावा घेऊन 50+ धावा केल्या. विराटने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. विराट या सेमीफायनल सामन्याचा मोठा हिरो ठरला. त्याला मोठ्या सामन्याचा खेळाडू का म्हटले जाते हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. विराट कोहलीला सेमीफायनल सामन्याचा सामनावीर पुरस्कार देण्यात आला. (India vs Australia Semifinal 1 Player Of The Match Virat Kohli)
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडीयाची विजयी घोडदौड; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत 5व्यांदा प्रवेश
IND vs AUS: बदला पूर्ण! ऑस्ट्रेलियाच्या चारी मुंड्या चीत! भारताची फायनलमध्ये धडक…!
IND vs AUS: निर्णायक सामन्यात ‘किंग’ कोहलीचा जलवा! अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज
Comments are closed.