भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, मदर ऑफ ऑल डीलची उद्याच घोषणा

नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करारासंदर्भात डील झाली आहे. या डीलला आता मदर ऑफ ऑल डील म्हटलं जात आहे. या संदर्भातील चर्चा 2007 मध्ये सुरु झाली होती. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी म्हटलं की ऐतिहासिक कराराची घोषणा मंगळवारी होणार आहे. करारावर अंतिम स्वाक्षरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होतील.

India EU FTA : मदर ऑफ ऑल डीलची उद्या घोषणा

सचिव राजेश अग्रवाल यांनी म्हटलं की कराराचा मसुदा आणि त्याचे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यात 5 ते 6 महिने लागणार आहेत. यानंतर दोन्ही पक्ष या करारावर अधिकृत हस्ताक्षर करतील. सरकारच्या अंदाजानुसार हा मुक्त व्यापार करार पुढील वर्षी लागू होईल. या करारामुळं भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील आर्थिक सहकार्य वाढेल. याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करत दोन्ही अर्थव्यवस्थांना जोडणं हा आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार या डीलमुळं भारतीय निर्यातदारांना उद्योग आणि गुंतवणुकीसाठी यूरोपियन बाजारात पोहोचता येईल. युरोपियन कंपन्यांना वेगानं भारतात तेजीनं वाढणाऱ्या ग्राहक बाजारात प्रवेशाची संधी मिळेल.

वाणिज्य सचिवांच्या माहितीनुसार हा करार अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही पक्षांचं हित समान पद्धतीनं लक्षात ठेवण्यात आलं आहे. दीर्घकालीन आर्थिक सहयोग मजबूत होईल आणि जागतिक पुरवठा साखळी, गुंतवणूक आणि व्यापाराची नवी समीकरण यात भारत आणि युरोपियन युनियन नवी यांच्यातील करार नवी दिशा देईल.तज्ज्ञांच्या मते मुक्त व्यापार करारामुळं दोन्ही बाजूंची रणनितीक भागिदारी मजबूत होईल. यामुळं भारताचं जागतिक व्यापर धोरणात महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

मुक्त व्यापार करारामुळं दोन्ही बाजू 90 टक्क्यांहून अधिक वस्तूंवरील आयात शुल्क रद्द करण्यावर सहमत झाल्या. याशिवाय टेलीकॉम, वाहतूक, अकाऊंटिंग आणि ऑडिटिंग सारख्या क्षेत्रात व्यापार अधिक सुलभ बनवण्याची तरतूद आहे.

सध्या भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आणि लेबर इन्सेटिव्ह सेक्टरवर 10 टक्के आयात शुल्क युरोपियन युनियन आकारतं. साधारणपणे हे शुल्क 3.8 टक्के होतं. भारत युरोपियन युनियनच्या वस्तूंच्या आयातीवर 9.3 टक्के शुल्क आकारतं. यात सर्वाधिक शुल्क 35.5 टक्के  ऑटोमोबाइल्स आणि इतर पार्टसवर आकारलं जातं. प्लॅस्टिकवर 10.4 टक्के आणि रसायनांवर 9.9 टक्के आयात शुल्क आहे.

दरम्यान, भारतातून मोठ्या प्रमाणावर निर्यात युरोपियन युनियनला केली जाते. भारताच्या निर्यातीच्या एकूण 17 टक्के निर्यात EU ला केली जाते.

आणखी वाचा

Comments are closed.