भारतीय गोलंदाजांचा जलवा.,पाकिस्तानने दिल भारताला 242 धावांचं आव्हान
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघ संथ गतीने खेळत होता. सऊद शकीलने अर्धशतकी खेळी करुन सुद्धा पाकिस्तान संघ 250 ची धावसंख्या पार करू शकला नाही. पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा पहिला सामना न्यूझीलंडकडून पराभूत झाला आहे. आता भारतीय संघाच्या विरुद्ध जिंकण्यासाठी त्यांना 242 धावांना वाचवावे लागेल.
दुबईमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये हा सामना खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवानने फलंदाजीचा निर्णय घेतला होता, पण पहिल्यांदा खेळताना त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. बाबर आझमने सुरुवात तर चांगली केली होती, पण तो 23 धावा करून बाद झाला. 47 धावांवर पाकिस्तानचे दोन गडी बाद झाले. सऊद शकील आणि मोहम्मद रिजवानने त्यानंतर दोघांनी मिळून 104 धावा केल्या. शकीलने 62 धावांची महत्त्वपूर्ण पारी खेळली.
मोहम्मद रिजवानने 46 धावा तर केल्या पण या धावा करण्यासाठी त्याने 77 चेंडू खेळले. रिजवानच टी-20 क्रिकेट मध्ये 59.74 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणे पाकिस्तानला भारी पडेल. या कारणामुळे भारतीय संघ चांगली गोलंदाजी करू शकला. खुशदिल शाहने पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची लाज राखली आणि 38 धावांची महत्त्वाची पारी खेळली.
भारतीय संघासाठी मधल्या षटकारात कुलदीप यादवने गोलंदाजी केली. त्याने 9 षटकारात 40 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. त्याने सर्वप्रथम सलमान आगाला बाद केले. त्याने 19 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने शाहीन आफ्रिदीला बाद केले. त्याने तिसरी विकेट नसीम शाहची घेतली. त्याने 14 धावा केल्या होत्या. याशिवाय भारतीय संघासाठी हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. तसेच हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी एक-एक विकेट घेतली.
हेही वाचा
CSK प्रती धोनीचे प्रेम की प्रमोशन? भारत-पाक सामन्यातील लूकमुळे चर्चा गरम!
क्रिकेट आणि सिनेमा एकाच फ्रेममध्ये; स्टार्सनी रंगवला भारत-पाकिस्तान सामना
सोनेरी घड्याळ आणि दमदार खेळ – हार्दिक पांड्याने क्रिकेटप्रेमींना वेड लावले!
Comments are closed.